'शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील'; अजित पवार
लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
‘शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मात्र, आढळराव पाटलांना किती मताधिक्य मिळेल? या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही’, असेही त्यांनी परखडपणे सांगितले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे.अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List