LS Election 2024 phase 2 : महाराष्ट्रात उद्या किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?

LS Election 2024 phase 2 : महाराष्ट्रात उद्या किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?

देशात 18 व्या लोकसभा निवडणुकीला 21 एप्रिलला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान झालं. जवळपास 64 टक्के मतदान झालं. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी या भागात मतदान झालं.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार लोकसभेवर जातात. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे. 19 एप्रिलच मतदान झालं. आता 26 एप्रिलला उद्या, त्यानंतर 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कुठे मतदान झालं

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, .चंद्रपूर,

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कुठे मतदान होणार?

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी,

विदर्भात 6 आणि मराठवाड्यात 2 मतदारसंघात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, तिथे शाळा-कॉलेजेस बंद असतील.

देशात किती राज्यात होणार मतदान ?

दुसऱ्या टप्प्यात देशात एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदान होणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;