पार्थ भाऊ म्हणून सांगतो, 2019 मधील तुझा पराभव विसरलो नाही, पण अजितदादा… रोहित पवार यांनी डिवचले

पार्थ भाऊ म्हणून सांगतो,  2019 मधील तुझा पराभव विसरलो नाही, पण अजितदादा… रोहित पवार यांनी डिवचले

मावळ लोकसभा क्षेत्रात 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचा पराभव केला होता. आता अजित पवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार करत आहेत. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांनी डिवचले आहे. भावनिक होऊन पार्थला साद रोहित पवार यांनी घातली आहे. पार्थ भाऊ म्हणून सांगतो, 2019 मधील तुझा पराभव विसरलो नाही, असे रोहित पवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

काय म्हणाले रोहित पवार

पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 ला पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात उभा होता. त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे प्रचाराला आलो आहे. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत. ते कुठल्या पातळीवर गेले आहेत, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला.

जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, जयला विनंती करायची आहे. त्याने भाजपची सवय लावू घेऊ नये. भाजप सारखे खोटे बोलणार तुझी प्रतिमा करु नको. पार्थ पवार यांना दिलेल्या सुरक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी टीका केली. इकडे कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही देणे घेणे नाही. पार्थला वाय कशाला झेड सुरक्षा द्या, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

जिल्हा परिषद निवडणूक

मला जिल्हा परिषद लढायची होती. त्यासंदर्भात shrirang barne, अजित पवार यांना बोललो होतो. सर्वांनी मान्य केल्यानंतर मला अबी फॉर्म दिला. शरद पवार यांनी सर्व अधिकार अजित पवार यांना दिले होते. त्यामुळे अजित पवार यांनी मला एबी फार्म दिला. मी अपक्ष लढणार नव्हतो, अजित पवार खोटे बोलत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

रोहित पवारांना अहंकार आलाय असे कोणी म्हटलं तर लोकांना जोक वाटेल, सुनील शेळके यांनी मला मुख्यमंत्री रेसमध्ये आणलं याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;