AIMIM ला धक्का बसू नये म्हणून ओवेसींची अजून एक चाल; हैदराबादमधून दिली भावाला पण उमेदवारी; कारण तर समजून घ्या

AIMIM ला धक्का बसू नये म्हणून ओवेसींची अजून एक चाल; हैदराबादमधून दिली भावाला पण उमेदवारी; कारण तर समजून घ्या

तर आपला गड ढासळू नये, कोणी दगाफटका करु नये यासाठी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राजकीय सारीपाटावर एक अनोखी चाल चालली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये काँग्रेसचे नीलेश कुंभानी यांना अनुमोदकच न मिळाल्याने भाजपने बिनविरोध ही जागा खिशात घातली.. देशात अनेक ठिकाणी ना-ना प्रकार घडत आहेत. त्यामुळे ओवेसी बंधू अगोदरच अलर्ट झाले आहेत. हैदराबाद मतदारसंघातून दोन्ही भावांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. तुम्हाला वाटत असेल हे दोघे एकमेकांविरोधात लढत आहेत तर तसे नाही, त्यामागे आहे हे कारण…

अकबरुद्दीन विरोधी नाही तर पर्यायी उमेदवार

हैदराबाद मतदारसंघात एआयएमआयएमकडून दोन्ही भावांनी निवडणुकीत शड्डू ठोकले आहे. पण ते काही एकमेकांविरोधात उतरले नाहीत. तर अकबरुद्दीन ओवेसी यांनी पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. जर काही कारणांनी असदुद्दीन ओवेसी यांचे नामनिर्देशन पत्र रद्द झाले. तर बॅकअप म्हणून पक्षाकडून अकबरुद्दीन ओवेसी हे निवडणुकीच्या आखाड्यात असतील. पक्षाचा एक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असेल.

सुरतमध्ये घडले काय

सुरत लोकसभा मतदार संघात काँग्रेसने नीलेश कुंभाणी यांना तिकीट दिले. त्यांनी निवडणूक अर्जासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. पण त्यांच्या नामनिर्देशन पत्रावरील तीन अनुमोदकांच्या स्वाक्षरीवर हरकत घेण्यात आली. भाजपचे दिनेश जोधानी यांनी हे हस्ताक्षर बनावट असल्याचा दावा केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा कालावधी दिला. पण जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे तीनही अनुमोदक काही आले नाही. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आले.

दगाफटका टाळण्यासाठी काळजी

आता हैदारबादमध्ये कुठल्याही प्रकारचा दगाफटका टाळण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी अगोदरच ही चाल चालली आहे. सुरतमध्ये अनाकलनीय प्रकारे इतर उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुले भाजपचे दिनेश जोधानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. . देशात सुरत सारखी अनेक उदाहरणे समोर आली आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी एआयएमआयएमने अकबरुद्दीन ओवेसी यांना मैदानात उतरवले आहे.

भाजपच्या माधवी लतांचे आव्हान

असदुद्दीन ओवेसी यांचा हा मतदारसंघ गड आहे. ते चार वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. येथील स्थानिक निवडणुकीत भाजपने काही दिवसांपूर्वी पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे हा मतदार खेचून आणण्यासाठी भाजप ताकदीने प्रयत्न करत आहे. याच मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी सहा वेळा निवडून गेले होते. आता ओवेसी यांना भाजपच्या माधवी लता यांनी तगडे आव्हान दिले आहे. तर भारत राष्ट्र समितीकडून गद्दाम श्रीनिवास यादव पण मैदानात आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;