निवडणुकीच्या काळात हे ‘व्यवहार’ रडारावर; भाऊ, दादासाठी मनी ट्रान्सफर करणे येईल बरं अंगलट

निवडणुकीच्या काळात हे ‘व्यवहार’ रडारावर; भाऊ, दादासाठी मनी ट्रान्सफर करणे येईल बरं अंगलट

निवडणुकीच्या काळात रुपये, पैशांची हेराफेरी मोठ्या प्रमाणात वाढते. मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्यात येते. काही ठिकाणी युपीआयच्या माध्यमातून मोठ-मोठ्या रक्कमा अथवा छोट्या रक्कमा पाठविण्यात येतात. खात्यातील या व्यवहारांवर केंद्रीय रिझर्व्ह बँकेची करडी नजर आहे. त्यांनी पेमेंट कंपन्यांना याविषयीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात दादा-भाऊच्या सांगण्यावरुन अनोळखी क्रमांकावर रक्कम हस्तांतरीत करण्याचा उपद्व्याप अंगलट येऊ शकतो.

पेमेंट कंपन्या, बँकांना पत्र

निवडणूक काळातील संशयित व्यवहारांवर आरबीआयचे लक्ष असेल. तसेच अनेक छोट्या-छोट्या व्यवहारांवर पेमेंट कंपन्यांचे लक्ष असेल. याविषयीचे निर्देश केंद्रीय बँकेने 15 एप्रिल रोजी पेमेंट कंपन्या आणि बँकांना दिले आहेत. त्यानुसार, पेमेंट प्रणालीआधारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न रडारवर येणार आहे. उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना प्रभावित करण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा दुरुपयोग करु शकतात. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आरबीआय प्रत्येक व्यवहारावर करडी नजर ठेवून आहे.

नाहीतर चौकशीचा ससेमिरा

दादा, भाऊच्या सांगण्यावरुन अनेक क्रमांकावर, अनोळखी क्रमांकावर पेमेंट करु नका. छोट्या छोट्या रक्कमांवर सुद्धा आणि तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवर पेमेंट कंपन्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे नाहक चौकशीचा ससेमीरा मागे लागू शकतो. तेव्हा सावध राहा. यापूर्वी कधीही ज्या क्रमांकावर तुम्ही व्यवहार केलेला नाही. तसेच ओळखीच्या क्रमांकावर अधिक व्यवहार दिसल्यास चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो.

पेमेंट कंपन्यांकडून अहवाल

अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांची माहिती पेमेंट कंपन्यांना आरबीआयला द्यायची आहे. तसेच अशा व्यवहारांची यादी, क्रमांक आणि समोरील व्यक्तीची माहिती याविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे. फिनटेक कंपन्या, ॲग्रिगेटर आणि मोबाईल वॉलेट कंपन्या निवडणूक काळातील या प्रकारच्या व्यवहारांची माहिती, अहवाल सादर करणार आहेत.

डिजिटल पेमेंटवर लक्ष

आरबीआयने पेमेंट कंपन्यांन सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. युपीआय, कार्ड पेमेंट, ऑनलाईन पेमेंटवर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. डिजिटल प्रणालीचा निवडणूक काळात गैरप्रकार टाळण्यासाठी व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;