तर आम्हीही तुझ्याशी बोललो नसतो, पक्ष फुटीनंतर घरात नेमकं काय घडलं?; रोहित पवार यांनी सांगितला किस्सा

तर आम्हीही तुझ्याशी बोललो नसतो, पक्ष फुटीनंतर घरात नेमकं काय घडलं?; रोहित पवार यांनी सांगितला किस्सा

अजित पवार यांनी बंड केलं आणि पक्षात फूट पडली. अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या या निर्णयामुळे नुसता राष्ट्रवादी पक्षच फुटला नाही, तर पवार कुटुंबही फुटलं. कुटुंबात दोन गट पडले. कुटुंबातील काही लोकांनी अजितदादांनी साथ दिली. तर काहींनी शरद पवारांना. पण शरद पवार यांना साथ देणारा कुटुंबातील घटक अधिक आहे. पक्ष फुटण्याच्या काळात कुटुंबात नेमकं काय घडत होतं. घरातील मुलांवर काय परिणाम होत होता, त्यांची मानसिकता काय झाली होती? याची प्रचिती देणारा एक किस्साच आमदार रोहित पवार यांनी सांगितला. त्यावरून पवार कुटुंबातील आजच्या पिढीवर या पक्ष फुटीचा किती खोल परिणाम झाला हे स्पष्ट होतं.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे इंदापुरात होते. प्रचार करत असताना एका सभेत त्यांनी घरातीलच किस्सा सांगितला. आमचे आजोबा शरद पवार यांनी 60 वर्ष जो विचार जपला तो विचार ते आजही जपत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. जेव्हा ही कुटुंब फुटल्याची घटना घडली तेव्हा माझ्या लहान मुलांनी मला विचारले की, तू कुणाबरोबर आहेस? मी सांगितले मी आजोबा बरोबर आहे. त्यावर ते म्हणाले, तू जर आजोबा बरोबर गेला नसतास तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

मुलं म्हणाली असती गेट आऊट…

माझी मुलं एवढंच बोलून थांबली नाहीत. मुलं म्हणाली, आता आम्ही लहान आहोत. ज्या वेळेस आम्ही शिकून मोठे झालो असतो, त्यावेळेस तुला सांगितलं असतं की, आता तू तुझं वेगळं घर बघ, असं रोहित पवार म्हणाले. म्हणजे याची भीती अशी आहे की 15 वर्षांनी माझी मुलं देखील मला म्हटले असते की, जा आता तू गेट आउट. यावर मला युक्तिवाद करता आला नसता. कारण मी माझ्या आजोबांबरोबर असं वागलो असतो तर माझी मुलंही माझ्याशी तशीच वागली असती, असा कौटुंबिक किस्साच रोहित पवार यांनी सांगितला.

माझा अरविंद केजरीवाल होणार

माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. मात्र ते माहीत असतानाही मीही भूमिका घेतली. कारण ती खरी भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आमच्यावर बऱ्याच कारवाई झाल्या आणि आणखीन होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी देखील माझ्यावर कारवाई केली जाईल, असं काही भाजपच्याच लोकांनी मला सांगितले आहे. जे भाजपच्या कोअर कमिटीमध्ये बसतात त्यांनी सांगितलंय की, लोकसभा झाल्यानंतर त्याच्याकडे बघू. त्याचा अरविंद केजरीवाल करू. मात्र आम्ही त्यास घाबरत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;