अमरावतीत पवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल, पुतिन यांच्याशी केली मोदींची तुलना

अमरावतीत पवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल, पुतिन यांच्याशी केली मोदींची तुलना

अमरावती : अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखडेंसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवारांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. 2019 मध्ये नवनीत राणांना खासदार करुन चूक झाली अशी चूक पुन्हा करणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. अमरावतीतून शरद पवारांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला..2019 मध्ये नवनीत राणांसाठी जागा सोडून त्यांना खासदार केलं, ही आपली चूक झाली. यापुढं चूक होणार नाही, असं सांगून शरद पवारांनी काँग्रेसच्या बळवंत वानखडेंना मतदान करा, असं आवाहन केलंय.

नवनीत राणा यांच्यावर निशाणा

2019 ला नवनीत राणा अपक्ष लढल्या. आघाडीत अमरावतीची जागा राष्ट्रवादीला सुटली होती आणि शरद पवारांनी इथं उमेदवार न देता, नवनीत राणांना पाठिंबा दिला होता. मात्र विजयानंतर नवनीत राणांचा कल भाजपच्या बाजूनं गेला. आणि आता तर त्या भाजपच्याच उमेदवार आहेत. शरद पवारांनी अमरावतीकरांना चूक सुधारण्याचं आवाहन केलं, तर उद्धव ठाकरेंनी थापाड्यांची लंका जाळण्यासाठी आल्याचं सांगत
नवनीत राणांना आव्हान दिलं.

अमरावतीत तिहेरी लढत

भाजपच्या नवनीत राणांचा सामना, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारच्या दिनेश बूब यांच्याशी आहे. वानखडेंसाठी ठाकरे आणि पवारही मैदानात उतरले आहेत. पवारांनी आपल्या भाषणातून राणांसह पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पवारांनी मोदींची तुलना रशियाचे हुकूमशाह पुतीन यांच्याशी केली.

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी देशभरात जोरदार प्रचार सुरु आहे आणि पंतप्रधान मोदींनी राजस्थानातल्या सभेतून मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देवून नवा वाद निर्माण झालाय. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा असून अधिक मुलं असणाऱ्यांना काँग्रेस संपत्ती वाटून देईल, असं मोदी म्हणाले आहेत.

मोदींनी 18 वर्षांआधीचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्य चर्चेत आणलं. 2006 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेत मनमोहन सिंग यांनी मुस्लिमांसह एससी आणि एसटी समाजाचा उल्लेख केलेला होता. आता मोदी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर घाबरलेत. त्यामुळं मनमोहन सिंहांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ काढून प्रक्षोभक भाषण देत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;