कणखर आढळराव पाटील चिमुकल्याच्या शुभेच्छांनी झाले भावुक..!

कणखर आढळराव पाटील चिमुकल्याच्या शुभेच्छांनी झाले भावुक..!

पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात असणारे त्याचबरोबर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून जनतेने निवडून दिलेले कणखर व कट्टर नेतृत्व म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच जोरावर ते यंदाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवत आहेत. 

पुणे : पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात असणारे त्याचबरोबर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून जनतेने निवडून दिलेले कणखर व कट्टर नेतृत्व म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच जोरावर ते यंदाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवत आहेत. 

एक अभ्यासू, कणखर, आक्रमक, कृतिशील खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांनी आजवर काम केले आहे, त्यातच नुकतेच निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने लौकी येथे देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान स्व. सुधीर पंढरीनाथ थोरात यांचा चिरंजीव कु. यश सुधीर थोरात या चिमुकल्याने आढळराव पाटील यांना लेखी पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छांनी कणखर मनाचे आढळराव देखील भावुक झाले..

मा. श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील 
शहिद जवान माझे पप्पा स्व. सुधीरजी पंढरीनाथ थोरात, देशाचे रक्षण करत असताना त्यांना वीरमरण आले. आपण एक कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहिलात आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत, तुम्हाला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळो.
वंदे मातरम
Best of luck आजोबा..!
अशा शब्दांत यश थोरात या चिमूकल्याने आढळराव पाटील यांना लेखी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी 'शिवाजीदादा खरच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले, माझ्यावर माझ्या कुटुंबावर ज्यावेळी वेळ होती त्या वेळी मला भावासारखा आधार दिला हे मी कधी विसरू शकत नाही अशी भावना वीर माता सौ. कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांसह शिवाजीराव आढळराव पाटील भावनिक झाले. जनतेचं हे प्रेम व आपुलकी पाहून मन गहिवरून आले, माझ्या जनतेचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहते. यापुढे यशच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी माझी असा शब्द त्यांनी यावेळी वीरमाता कौसल्या थोरात यांना दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;