आता अजितदादांच्या मुलाचीही सुप्रिया सुळेंवर टीका; त्यांना संसदरत्न मिळाला, तुम्हाला?

आता अजितदादांच्या मुलाचीही सुप्रिया सुळेंवर टीका; त्यांना संसदरत्न मिळाला, तुम्हाला?

बारामतीमध्ये निवडणुकीचा फिवर चांगलाच वाढला आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण हे आरोपप्रत्यारोप एकाच कुटुंबात होताना दिसत आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदरत्न पुरस्कारावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनीच आपल्या आत्याच्या संसदरत्न पुरस्कारावरून सवाल केला आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला, भोर तालुक्याला काय मिळालं? असा सवालच जय पवार यांनी केला आहे. जय पवार यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

जय पवार यांनी भोर तालुक्यात एका रॅलीला संबोधित करताना हा सवाल केला आहे. अनेक वर्ष तुम्ही सुप्रियाताईंना संधी दिली होती. त्यांना खासदार बनवलेलं होतं, पण जशी कामे व्हायला पाहिजे होती तशी काहीच काम दिसली नाहीत, अशी टीकाच जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता केली.

तो मोठा पुरस्कार नाही

आज त्या बोलतायत मला संसदरत्न पुरस्कार मिळालाय, त्यांना पुरस्कार मिळालाय. पण तुमच्या भोर तालुक्याला काय मिळाल? संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाहीये, हा एका एनजीओ मार्फत दिला जातो. त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही, असा हल्लाच जय यांनी चढवला आहे.

खोटं बोलून त्यांना काय मिळतंय

मीडियाचा गैरवापर कसा करायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. काल बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो. तेव्हा मी त्यांना बोललो, आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा. तर त्या म्हणाल्या, नाही… जय तू आधी ठेव. मग मी नारळ ठेवून डोळे मिटून प्रार्थना करत होतो. त्याच वेळेस माझ्या शेजारी बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभे राहिले.

मी प्रार्थना करत असताना सुप्रियाताई म्हणाल्या, काय जय कसं चाललंय, मला वाटलं त्या मला म्हणाल्या. म्हणून मी डोळे उघडून त्यांना बोललो आता सगळं बर आहे. मग त्या मला म्हणाल्या, मी तुला नाही. मी दुसऱ्या जयशी बोलत होते. पण नंतर त्यांनी ते सर्व व्हिडिओ पत्रकारांना दिलेआणि त्यांना खोटी बातमी करायला लावली. सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली, अशी बातमी त्यांनी करायला सांगितली. हे खोटं बोलून त्यांना काय मिळतंय?, असा सवाल त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;