Sharad Pawar : देशाची घटना बदलण्यावर शरद पवार यांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले…

Sharad Pawar : देशाची घटना बदलण्यावर शरद पवार यांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले…

“देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. गेली दहा वर्ष आपण पाहत आहोत. अनेक ठिकाणची त्यांची भाषण ऐकत आहोत. मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत गेली 56 वर्ष आहे. संसदेत अशी एकही व्यक्ती नाही की एकाही दिवसाचा गॅप न घेता सतत निवडून येतो. या ५६ वर्षात अनेकांना मी जवळून पाहिलं. लांबून पाहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं. राजीव गांधींचं कामकाज पाहिलं. नरसिंह राव,मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. जे जे पंतप्रधान झाले, नेहरू नंतरचे त्या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचं भाषणं करायचं आणि नवा भारत कसा उभा राहील लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतील अशी टीका शरद पवार यांनी केली” शरद पवार अमरावतीमध्ये प्रचारसभेला संबोधित करत होते.

“काँग्रेसवर टीका करतील. ज्या नेहरुंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळात आयुष्याची उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगात घालवली. स्वातंत्र्यानंतर देश संसदीय पद्दतीने चालला पाहिजे. त्यासाठी रचना उभी केली. त्या नेहरूंचं योगदान देशाच्या इतिहासातून पुसून काढू शकत नाही. पण आजचे पंतप्रधान हे नेहरूंवर टीका करतात. त्यांच्या चुका शोधतात. पण दहा वर्षात मी काय केलं हे सांगत नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.

‘मोदींना दिसू नये म्हणून, इतकी दहशत’

“राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो, मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का?” असं शरद पवार म्हणाले.

‘मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय’

“भाजपाकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय ही चिंता आहे” असं शरद पवार म्हणाले.

‘त्यासाठी घटना बदलायला पाहिजे’

“संसदीय लोकशाही संकटात जाईल असं लोक म्हणत आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्याने बंगलोरमध्ये भाषण केलं. मोदींना ज्या पद्धतीने देश चालवायाचा आहे. त्यासाठी घटना बदलायला पाहिजे. भाजपचा खासदार जाहीरपणे म्हणतो, घटना बदलयाची आहे. मोदींना सत्ता द्या. उत्तर प्रदेशातही तेच सांगितलं जातं, मोदींचे हात बळकट करायचे असेल तर संविधान बदललं पाहिजे. बाबासाहेबांनी मोठं योगदान दिलं ते म्हणजे संविधान. आजबाजूचे देश पाहा. पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती. श्रीलंकेत लष्करशाही, नेपाळमध्ये हुकूमशाही आणि चीनमध्ये हुकूमशाही आहे. त्यामुळे देशाचं संविधान वाचवलं पाहिजे. त्यासाठी आपण लढलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;