घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर राजकारणातून अलिप्त होणाऱ्या बड्या नेत्याचा महायुतीचा बॅनरवर फोटो… ठाकरे गटाने साधला निशाणा

घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर राजकारणातून अलिप्त होणाऱ्या बड्या नेत्याचा महायुतीचा बॅनरवर फोटो… ठाकरे गटाने साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगू लागला आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवार अर्ज भरत असताना दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील प्रचारास वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद प्रकार केले जात आहेत. राज्यातील राजकारणात चर्चेचे राहिलेले जळगावातील सुरेशदादा घरकूल प्रकरणानंतर राजकारणातून अलिप्त झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कोणत्याही राजकीय पक्षासोबत गेले नाही. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही गेले नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर सुरु झाला आहे. महायुतीच्या बॅनरवर कधी काळी शिवसेनेचे असलेल्या सुरेश जैन यांचा फोटो लावल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सुरेश जैन यांच्या परवानगीशिवाय भाजपकडून फोटो वापरला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

सुरेश जैन यांच्या वलयाचा फायदा घेण्यासाठी…

जळगाव जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात सुरेश जैन यांचे वलय होते. विक्रमी नऊ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. युती सरकारमध्ये ते मंत्री होते. परंतु त्या काळात जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यात राजकीय वैमानस्य सुरु होते. त्यावेळी आक्रमक राहणारे सुरेश जैन घरकूल प्रकरणामुळे अडचणीत आले. त्यांना या प्रकरणात शिक्षा झाली. या गुन्ह्यात दोषी ठरवले आणि सात वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून स्वत:ला अलिप्त करुन घेतले.

आता सुरेश जैन यांचा फोटो

सुरेश जैन हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून आलीप्त आहेत. परंतु आता भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मेळाव्यातील बॅनरवर सुरेश जैन यांचा फोटो वापरला गेला आहे. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. ज्याच्याकडे स्वतःचं काही नसतं ते स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी असेच धंदे करू शकतो, संकट मोचक संकटात सापडल्यामुळे त्यांना अशी सर्व धंदे करावे लागत आहे, असा आरोप त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला.

सुरेश जैन यांच्या परवानगीशिवाय भाजपकडून फोटो वापरला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. मते मिळतील की नाही अशी भीती असल्याने काही लोक बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच जळगावमध्ये सुरेशदादा जैन यांचा फोटो बॅनर वापरत आहे, असे संजय सावंत यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;