‘त्या’ चर्चांनंतर थेट ‘मातोश्री’ गाठली, बाहेर आल्यानंतर मिलिंद नार्वेकर सायलंट; प्रश्न विचारताच…

‘त्या’ चर्चांनंतर थेट ‘मातोश्री’ गाठली, बाहेर आल्यानंतर मिलिंद नार्वेकर सायलंट; प्रश्न विचारताच…

उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सकाळपासून रंगल्या आहेत. शिंदे गटाने मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लढण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी थेट मातोश्री गाठली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते बाहेर पडले. मातोश्रीतून बाहेर आल्यानंतर नार्वेकर शांत होते. फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे मातोश्रीत नेमकं काय घडलं? मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतून लढणार का? असे प्रश्न अनिर्णित राहिले आहेत.

मिलिंद नार्वेकर आज सकाळीच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे दुपारी मीडियाशी संवाद साधणार असल्याचा निरोप आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत उठलेल्या चर्चांशी संबंध जोडला गेला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा विषय वेगळाच निघाला. त्यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटिशीवर भाष्य केलं. पण मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला.

हो नाही की ना नाही…

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हाही मिलिंद नार्वेकर मातोश्रीत होते. पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने ते मातोश्रीच्या बाहेर पडले. यावेळी त्यांना मीडियाने घेरलं. तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर हो सुद्धा म्हणाले नाहीत आणि नाही सुद्धा म्हणाले नाहीत. हसत हसत सर्वांना हात जोडत ते निघून गेले. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काय निर्णय घेणार हे अद्याप समजू शकले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या सायलंट राहण्यात गुपीत दडल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून प्रचार

दरम्यान, उद्धव ठाकरे उद्यापासून प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान संपलं आहे. आता येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्यापासून सुरुवात करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;