भाजप अध्यक्षांच्या स्वागताला गेल्या, पण घेतले शरद पवारांचे आशीर्वाद; विमानतळावर काय घडलं?

भाजप अध्यक्षांच्या स्वागताला गेल्या, पण घेतले शरद पवारांचे आशीर्वाद; विमानतळावर काय घडलं?

Smita Wagh Jalgaon : हल्ली राजकारणात सुसंस्कृतपणा कमी होत असल्याची सारखी ओरड होते. राजकारणातील खालच्या स्तरावरील भाषा, असभ्यपणा, शिवराळ भाषा यामुळे जनतेला पण त्याचा वीट आला आहे. पण काही प्रसंग अत्यंत बोलके असतात. ते अशा वातावरणात मनाला मोठी उभारी देतात. खानदेशमधील जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघात सध्या लढाई हातघाईला आली आहे. पक्षातंर्गत नाराजीचे सावट आहे. तर प्रतिस्पर्ध्याशी सामना सुरु आहे. अशात जळगावच्या विमानतळावर घडलेला हा प्रसंग तुम्हाला नक्कीच सूखद धक्का देईल.

केला नमस्कार, घेतला आशीर्वाद

जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे जळगाव विमानतळावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आल्या होत्या. विमानतळावर प्रवेश करताना त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. नाराजी नाट्य संपविण्यासाठी ते दाखल झाले. त्याचवेळी स्मिता वाघ यांच्याशी त्यांची भेट झाली. शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर स्मिता वाघ यांनी शरद पवार यांच्या पायाला नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला.

हाच तर सुसंस्कृतपणा

विरोधात असले तरी शरद पवार हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळे पितासामान असल्याने त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं स्मिता वाघ यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी पक्षाने विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याने भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांना धन्यवाद देण्यासाठी स्मिता वाघ जळगाव विमानतळावर आल्या होत्या.

आशीर्वाद पावणार की नाही?

शरद पवार यांचे त्यांनी यावेळी आशीर्वाद घेतले. त्यांच्या आशीर्वादाचा मला फायदा होतो का नाही हे कळेलच अशी खास प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी यावेळी दिली. जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे.पी नड्डा यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता. जे.पी नड्डा यांचे सुद्धा आशीर्वाद घेणार असून त्यांचे धन्यवाद व्यक्त करणार आहे.. शरद पवार यांच्या आगमनानंतर जळगाव विमानतळावर जेपी नड्डा यांचं आगमन होत असल्याने जळगाव जिल्ह्यातलं राजकारण चांगल तापलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;