जय भवानी शब्दावरुन रान पेटले; उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ललकारले

जय भवानी शब्दावरुन रान पेटले; उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ललकारले

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची निशाणी पण गेली. त्यांना धनुष्यबाण सोडून मशाल हाती घ्यावी लागली. आता मशाल गीतावरुन निवडणूक आयोगाने त्यांना कोंडीत पकडले आहे. मशाल गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले आहे. कारवाई करायची तर करा. पण आम्ही भवानी हा शब्द काढणार नाही. भवानी माता आमची अस्मिता आहे. अस्मितेशी तडजोड नाही, असा दमच त्यांनी भरला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाविरुद्धचा सामना रंगणार हे वेगळं सांगायला नको.

निवडणूक आयोगाचा फतवा आलाय

आम्ही जे गीत दिलं होतं त्या गीतात त्या गाण्याचा जोश वाढतोय. कोरसला जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढा. हा लेखी फतवा आला आहे. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.

जय भवानी शब्द काढणार नाही

राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राबद्दलचा आकस ठासून भरला आहे. पण महाराष्ट्रातील कुलदैवतांबाबतचा आकस असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. तुम्ही कितीही ठरवलं तरी जतना बघून घेईल. ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आज जय भवानी शब्द काढायला सांगितलं, उद्या जय शिवाजी हा शब्द काढायला सांगाल. आम्ही त्याविरोधात लढत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आयोगाला ठणकावले.

हा पक्षपातीपणा का?

तुळजा भवाई हे महाराष्ट्राचं दैवत आहे. कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. निवडणूक आयोगाला आम्ही तेव्हा हेही सा्ंगितलं होतं की उद्या भाजपला परमिशन देत असाल तर उद्या आम्ही हर हर महादेव बोललो, जय भवानी जय शिवाजी बोलल्यावर त्याला आक्षेप असता कामा नये, असे ते म्हणाले.

मग मोदी-शाहंवर कारवाई करा

मनोहर जोशींची सर्वोच्च न्यायालयात केस झाली होती. त्यात हिंदू धर्माची व्याख्या वेगळी केली आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत नाही मागितलं. आम्ही हिंदू धर्म सोडला अशी आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडे चाकर असलेल्या आयोगाने त्यावर उत्तर दिलं पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान म्हणाले की, बजरंग बली की जय बोलून मतदान करा. अमित शाह म्हणाले की आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला अयोध्येला नेऊ. मग आमच्यावर कारवाई करण्याअगोदर या दोघांवर कारवाई करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;