महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यावरुन वादंग, खरंच म्हणाल्या का, सेक्स हा त्यांच्या ऊर्जेचा स्त्रोत? व्हायरल व्हिडिओचे सत्य तरी काय

महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यावरुन वादंग, खरंच म्हणाल्या का, सेक्स हा त्यांच्या ऊर्जेचा स्त्रोत? व्हायरल व्हिडिओचे सत्य तरी काय

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा या बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. लोकसभेतील त्यांची अनेक भाषणं गाजली आहे. सरकारवर त्यांनी अनेकदा हल्लाबोल केलेला आहे. त्यासध्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर लढत आहेत. याठिकाणी राजामाता अमृता राव यांना भाजपने त्यांच्याविरोधात उतरवले आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेले असताना सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांना तुमच्या ऊर्जेचा स्त्रोत काय आहे, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर महुआ यांनी जे उत्तर दिले, त्यावरुन मोठे वादंग उठले आहे.

सोशल मीडियावर युझर्सचे दोन गट

महुआ मोईत्रा यांच्या उत्तरावरुन असा दावा करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या ऊर्जेचा स्त्रोत हा सेक्स असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी यावर कमेंट करताना, राहुल गांधी यांचे नाव न घेता, केरळमध्ये कुणीतरी या उत्तरामुळे खूश झाले असेल असा टोला लगावला आहे. मोईत्रा आणि गांधी दोन्हीपण निवडून येणार नसल्याचा दावा युझर करताना दिसतो. तर दुसरीकडे मोईत्रा यांच्या बाजूने पण काही नेटकरी उतरले आहे. मोईत्रा यांनी सेक्स नाही तर एग्स हा शब्द प्रयोग केल्याचा दावा नेटकरी करत आहेत. टीएमसी नेत्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मग सत्य तरी काय?

ही मुलाखत पत्रकार तमल साह यांनी घेतली होती. वाद विकोपाला गेल्यानंतर साह यांनी सोशल मीडियावर याविषयीचा खुलासा केला. साह यांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट लिहिली.

‘ मी स्पष्ट करतो की, मी मुलाखत घेतल्यानंतर सोशल मीडियावर जे पण काही सांगितले जात आहे. मी महुआ मोईत्रा यांना तुम्ही सकाळीच्या वेळी एनर्जी सोर्स काय असतो, असे विचारले होते. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, एग्स(अंडे). त्यामुळे अत्यंत लाजीरवाणे आहे की, काही भक्तमंडळी त्यांचे विधान अत्यंत गलिच्छ पद्धतीने सादर करत आहेत. या भक्तांनी सेक्स असा शब्द येण्यासाठी या क्लिपमध्ये छेडछाड केलेली आहे. ऑडिओ मुद्दाम बदलला आहे.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;