रजनीकांत ते विजय सेतुपती.. ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
पहिल्या टप्प्यात 13.63 कोटी मतदार 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतादानाचा हक्क बजावत आहेत. सर्व मतदार केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून 18 लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळत आहेत.
या टप्प्यात 134 महिलांसह 1625 उमेदवार रिंगणारत आहेत. चेन्नई आणि तामिळनाडूतील सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावर रजनीकांत यांच्यासोबत त्यांची टीमसुद्धा पोहोचली होती.
मक्कल निधी मैयमचे प्रमुख कमल हासन यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला. त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी पक्षाने DMK ला पाठिंबा दिला आणि प्रचार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List