‘साहेबांचा आदेश पाळू, पण…’, राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या मोठ्या नेत्याला पटली नाही का?

‘साहेबांचा आदेश पाळू, पण…’, राज ठाकरेंची भूमिका मनसेच्या मोठ्या नेत्याला पटली नाही का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडावा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मनसेमधून आता वेगवेगळे सूर समोर येऊ लागले आहेत. मनसे हा असा पक्ष आहे, ज्यात पक्षाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली, की त्याची फक्त अमलबजावणी होते. पण कोकणात असं होताना दिसत नाहीय. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्याने मनातील खदखद, भावना बोलून दाखवली आहे. नुकतीच मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक पार पडली. सर्व मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांची भूमिका पटल्याच दिसत नाहीय.

“या कोकणात 20 वर्ष मनसेची वाटचाल संघर्षमय राहिली आहे. या संघर्षात अनेकांनी पक्ष संपवण्यासाठी प्रयत्न केले. या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये टाकलं. पक्ष, नगसेवक फोडले या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी कशी करायची? या संदर्भात बैठक झाली. कार्यकर्त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या. ही तीव्रता कमी व्हायला थोडा वेळ लागेल” असं वैभव खेडेकर म्हणाले.

‘त्यांच्यासोबत कसं काम करायचं?’

“आम्हाला या आमच्या सगळ्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडणार आहोत. आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत. राज ठाकरे जसं मार्गदर्शन करतील, तशी आम्ही वाटचाल करु” असं वैभव खेडेकर म्हणाले. “मागच्या 20 वर्षात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये डांबलं. ज्यांनी नगरसेवक ग्रामपंचायत फोडली, त्यांच्यासोबत कसं काम करायचं? आजची बैठक आक्रमक झाली. साहेबांचा आदेश पाळला जाईल” असं वैभव खेडेकर म्हणाले. मागच्या पाच वर्षात खासदार सुनील तटकरे यांनी कुठलीही विकासकाम केली नाहीत, असा आरोप खेडेकर यांनी केला.

खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार?

“भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. सत्तेतल्या वाट्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच खच्चीकरण केलं. त्यांच्या व्यवसायात अडथळे आणले. खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार? या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करु. सातत्याने झालेला अन्याय, अवहेलना या व्यथा त्यांच्यासोमोर मांडू” असं वैभव खेडेकर म्हणाले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;