माजी मंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, घातपाताचा संशय

माजी मंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, घातपाताचा संशय

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विदर्भातील पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचारासाठी रात्रंदिवस एक केला जात आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा वाहनाचा भीषण अपघात होणार होता. पण चालकाच्या समयसूचकतेमुळे हा अपघात टळला. या अपघातातून डॉ. फुके बचावले आहे. हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे.

कसा घडला प्रकार

डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत होते. रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली.

ताफ्यातील वाहनाचा अपघात

डॉ. परिणय फुके यांचे वाहन अपघातातून बचावले. पण त्यांच्यामागे असलेल्या त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली.

संबंधित अज्ञात वाहननंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागमी कार्यकर्ते करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;