Navneet Rana : वडील म्हणाले पती-पत्नीला अक्कल नाही, त्यानंतर राणा दाम्पत्य थेट अडसूळ यांच्या घरी, खास Photos
आनंदराव अडसूळ यांनी आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. त्यांची अक्कल काढली. त्यानंतर राणा दाम्पत्य थेट अडसूळ यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं.
आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
"त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला. नवरा बायकोला बंटी बबली नाव दिली, ती विचारपूर्वक दिल्याचे ते म्हणाले. मी राजकारण सोडेल पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले"
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List