भाजपाला मोठा धक्का, दोन दिवसांपूर्वी फडणवीसांना भेटून गेलेला नेता आज शरद पवारांच्या भेटीला

भाजपाला मोठा धक्का, दोन दिवसांपूर्वी फडणवीसांना भेटून गेलेला नेता आज शरद पवारांच्या भेटीला

पश्चिम महाराष्ट्रात बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. माढ्यामध्ये रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याआधी ते भाजपामध्ये होते. माढ्यामध्ये भाजपाला या बंडखोरीचा फटका बसू शकतो. माढ्यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबाच राजकीय वर्चस्व आहे. माढ्याची जागा जिंकण्यासाठी स्थानिक समीकरण महत्त्वाची आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासोबत उत्तम जानकर विशेष विमानाने नागपूरला गेले होते. त्यावेळी उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात होतं.

पण आज हेच उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तम जानकर हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. “तालुक्यातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तशीच चर्चा पवारसाहेबांसमोर होणार आहे. या बैठकीत निर्णय होईल, त्यासाठी मी आणि मोहिते पाटील पवार साहेबांची भेट घेणार आहोत” असं उत्तम जानकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली नाही का?

“तालुक्यातील आमच्या गटाचे कार्यकर्ते आणि मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, आम्ही दोघांनी एकत्रित जाऊन पवारसाहेबांना भेटावं. पवारसाहेब योग्य मार्गदर्शन करतील” असं उत्तम जानकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली नाही का? या प्रश्नावर उत्तम जानकर म्हणाले की, “फडणवीसांसोबत झालेली चर्चा आणि शरद पवारांसोबत आज होणारी चर्चा, त्यानंतर 19 तारखेला वेळापूरमध्ये मेळावा होईल. त्यात दोन्ही भेटींच विश्लेषण करुन निर्णय होईल”

शरद पवारांकडून काय अपेक्षा आहेत?

शरद पवारांकडून काय अपेक्षा आहेत? त्यावर उत्तम जानकर म्हणाले की, “आमच्यावर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मोहिते पाटील आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक आहोत. अशा परिस्थितीत एकत्र कसं यायचं, याचं मार्गदर्शन पवारसाहेबच करु शकतात”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;