मी माघार घ्यायला तयार, पण माझी अट… विशाल पाटील यांचं मोठं विधान; काँग्रेस काय निर्णय घेणार?

मी माघार घ्यायला तयार, पण माझी अट… विशाल पाटील यांचं मोठं विधान; काँग्रेस काय निर्णय घेणार?

काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अखेर पक्षाविरुद्ध बंड केलं आहे. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यामुळे विशाल पाटील प्रचंड संतप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी सांगलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी अर्ज मागे घ्यायला तयार आहे, पण माझी अट आहे, असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीतून मी माघार घ्यायला तयार आहे. पण काँग्रेसने या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार द्यावा, अशी अट विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीसमोर ठेवली आहे. काही जणांना काँग्रेस आणि घराणी संपावावी, असे वाटत आहे, यामागे कोण आहे? का आहेत? याचा समाचार निवडणुकीनंतर घेतला जाईल, असा इशाराच विशाल पाटील यांनी दिला आहे. विशाल पाटील यांनी आता थेट काँग्रेसच्या कोर्टात चेंडू टाकल्याने काँग्रेस अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मशालवर लढण्याची ऑफर होती

यावेळी त्यांनी ठाकरे गटाने दिलेल्या ऑफरचा गौप्यस्फोट केला. जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. आपल्याला मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट विशाल पाटील यांनी केला. मला पक्षानेही मशाल चिन्हावर लढायला सांगितलं असतं तरी मी पक्षाच्या विचारधारेशी ठाम आहे, असं त्यांना सांगितलं असतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विधारधारेशी तडजोड नाही

माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची, अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे, अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती. राजकारणात लहानपणापासूनच यायची आपली इच्छा होती. पण पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही, ही देखील आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आपल्यालाच उमेदवारी मिळेल

विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, हे कोणाला बघवलं नाही, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास आज देखील आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;