‘टांगा पलटी’वरुन जहरी टीका! भाजप विरुद्ध संजय राऊत ‘सामना’

‘टांगा पलटी’वरुन जहरी टीका! भाजप विरुद्ध संजय राऊत ‘सामना’

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा टांगा पलटी केल्याची टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांची भाषाच घसरली. शिंदेंसह भाजपवर टीका करताना, राऊतांनी वादग्रस्त शब्द वापरले. प्रचारातली टीकेची धार शिवराळ भाषेपर्यंत कशी घसरली, हे राऊतांच्या भाषेतून स्पष्ट दिसतंय. त्यानंतर शिंदे गटाकडून शिरसाटांनीही राऊतांना नाच्या म्हटलं. भाजपनं लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशी केलीये. फडणवीसांनीही प्रचारात भाजपकडे मोदी नावाचं इंजिन असून विकासाची गाडी जोरात असल्याचं म्हटलं. तर संजय राऊतांनी पंतप्रधानांना भुताटकीची उपमा दिली.

भाजप विरुद्ध संजय राऊत सामना

सध्या भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरु झालाय. राऊतांसोबतचा हा टीकेचा सामना रद्द झालेली नोट ते ढब्बू पैशांपर्यंत आली. अर्थात त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्याच बोईसरच्या सभेतील वक्तव्यापासून झाली. महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर ठाकरे आणि पवारांचंच नाणं चालणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  ठाकरेंच्या याच टीकेला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रत्युत्तर ट्विट करत प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल’ ठरवून टाकलं. बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला ‘मोदी की गॅरंटी’ या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी’च चालणार असं म्हटलं.

राऊतांची मोदींवर टीका

यावरुन संजय राऊतांनी मोदींना रद्द झालेली 2 हजारांची नोट तर बावनकुळे यांना ढब्बू पैसा म्हटलं आणि बावनकुळेंना ढब्बू पैसा म्हटल्यावर भाजप पुन्हा आक्रमक झाली. शिवकालीन ढब्बू पैशाचं मोल राऊतांना कळणार नाही, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलं.

उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राज्याची चाकरी सुरू झाली. त्यामुळे शिवकालीन ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार? असं भाजपने म्हटलं. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 6 दिवस बाकी आहे. त्यामुळं पहिल्या फेजमधील अंतिम टप्प्यातील शाब्दिक चकमकही टोकाला पोहोचली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;