वसंत मोरे यांचा यू टर्न, राज ठाकरे यांची भेट घेणार, साहेब नाराज पण…

वसंत मोरे यांचा यू टर्न, राज ठाकरे यांची भेट घेणार, साहेब नाराज पण…

मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा फोन घेण्याचे टाळले. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की, “पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल.” असे वसंत मोरे म्हणाले होते. परंतु आता वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आपण राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता का घेणार राज ठाकरे यांची भेट

पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. परंतु काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

साहेब नाराज आहेत, पण…

वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्ष होतो.
काय होते हे घोडा मैदान जवळ असेल तेव्हा बघू.

पुण्यात आपलेच राजकारण

पुण्यात ना भाऊ, ना अण्णा, असे कोणाचे राजकारण चालणार नाही. आपलेच तात्यांचे (वसंत मोरे) राजकारण चालणार आहे. पुणेकरांचा विश्वास आपल्यावर आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ, असे वसंत मोरे यांनी सांगितले. वसंत मोरे 2007, 2012, 2017 अशा तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत मोरे पुणे महापालिकेवर मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;