Category
campaign
पुणे  राजकीय 

भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग

भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात रँली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. युवक-युवतींनी शिवाजीदादा यांच्यावर पुष्पवृष्टि केली. यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले. 
Read More...

Advertisement