Category
affidavit
पुणे  राजकीय 

गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती?

गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती? शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी बुधवारी आपला उमेदवार अर्ज सादर केला. शिरुरची लढत ही राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक मानली जात आहे. याठिकाणी अजितदादा गटाने ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करुन स्वत:च्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे.
Read More...

Advertisement