Urvashi Rautela : ऋषभ सोडा, उर्वशीच्या आयुष्यात ‘या’ दिग्गज खेळाडूची एंट्री का? त्याचा महिन्याचा पगार 148 कोटी रुपये
उर्वशी रौतेलाच नाव निघालं की, ऋषभ पंत डोळ्यासमोर येतो. ऋषभच नाव उर्वशी सोबत जोडलं जातं. काही काळापूर्वी दोघांनी सोशल मीडियावरुन परस्परांना भरपूर टोमणे मारले होते. उर्वशीच नाव एका पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत सुद्धा जोडल गेलेलं.
याच उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात आता एका व्यक्तीची एंट्री झाल्याची चर्चा आहे. हा सुद्धा क्रिडापटूच आहे. पण तो क्रिकेटर नाहीय. तो दुसऱ्या खेळाशी संबंधित आहे. त्या क्रीडा प्रकारातला तो दिग्गज आहे.
फ्रान्सच्या प्रसिद्ध फुटबॉलपटूसोबत उर्वशी रौतेलाचे फोटो व्हायरल होत आहेत. उर्वशी रौतेला तशी नेहमीच चर्चेत असते.
अनेकांच असं म्हणणं आहे की, उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात या प्रसिद्ध फुटबॉलवपटूची एंट्री झाली आहे. करीम बेंजमा त्याचं नाव आहे. उर्वशी या फुटबॉलरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
उर्वशी रौतेलाने अजून यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही किंवा दुजोरा दिलेला नाही. उर्वशी रौतेला आणि करीम बेंजमाची दुबईमध्ये भेट झाली. बेंजमाने तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला.
करीम बेंजमा हा फुटबॉल विश्वातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू आहे. सौदी अरेबियाचा क्लब अल इत्तिहादकडून तो खेळतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List