दारूविक्रेत्यांनी महापुरुषांचा आदर करायला हवा; डॉ. आंबेडकर जयंतीच्या ‘ड्राय डे’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

दारूविक्रेत्यांनी महापुरुषांचा आदर करायला हवा; डॉ. आंबेडकर जयंतीच्या ‘ड्राय डे’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी (14 एप्रिल 2024) ड्राय डे जाहीर करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. दारूविक्रेत्यांनी महापुरुषांचा आदर करायला हवा, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.

ड्राय डे जाहीर करण्याच्या मुद्यावर स्पष्टता असायला हवी. अद्याप तशी स्पष्टता नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकर जयंतीच्या ड्राय डेला स्थगिती देता येणार नाही. पण हे प्रकरण पूर्णपीठाकडे वर्ग करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात या मुद्यात स्पष्टता येईल, असे नमूद करत न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या पूर्ण पीठाकडे वर्ग केले.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुणे जिल्हाधिकारी यांनी 14 एप्रिलचा ड्राय डे 8 एप्रिल 2024 रोजी जाहीर केला. हा ड्राय डे रद्द करावा. ही याचिका प्रलंबित असताना ड्राय डेला स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.

काय आहे प्रकरण

पुणे व अन्य काही जिह्यांतील दारू विक्रेत्यांनी 14 एप्रिलच्या ड्राय डे विरोधात याचिका केली. किमान 7 दिवस आधी तरी ड्राय डेची सूचना द्यायला हवी. 14 एप्रिलला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही ठोस कारण नाही. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक सणाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच असे काही नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने याआधी दिला आहे. 14 एप्रिलला ड्राय डे जाहीर करण्याचे आदेश बेकायदा आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

राज्य शासनाचा युक्तिवाद

दारूविक्रीचा परवाना देण्याचे व रद्द करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. तसेच राज्य शासन ड्राय डे जाहीर करू शकते. सण-उत्सवात कायदा व सुवस्था प्रश्न निर्माण होऊ नये. सणांचा व महापुरुषांचा आदर राखला जावा यासाठी ड्राय डे जाहीर केला जातो. या कार्यवाहीत काहीही बेकायदा नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील एस. एच. कंकाळ यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;