‘बेस्ट’च्या धडकेत मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबाला पंधरा लाखांची भरपाई द्या! ‘एमएसीटी’चे प्रशासनाला आदेश
काळाचौकी येथे चार वर्षांपूर्वी रस्ता ओलांडताना ‘बेस्ट’ने धडक दिल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 15.66 लाखांची भरपाई द्या, असे आदेश मोटर ऑक्सिडंट क्लेम ट्रिब्युलंटने (एमएसीटी) दिले आहेत. यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुंटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
काळाचौकी येथे राहणारे उमाकांत यादव (47) हे 2018मध्ये रस्ता ओलांडताना ‘बेस्ट’ बसने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले हेते. मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात बेदरकारपणे बस चालवल्यामुळे ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची तक्रार यादव यांच्या मुलीने केली होती. तर अपघाता वेळी यादव यांनी मद्यपान केले होते, असा दावा ‘बेस्ट’कडून करण्यात आला होता. मृत यादव हे एका ऑईल कंपनीत काम करीत होते. त्यांना दरमहा 15 हजार रुपये पगार होता. बस अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला होता. त्यामुळे आपल्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यादव यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली होती. ही स्थिती लक्षात घेता आणि अपघाताप्रसंगी बेस्ट ड्रायव्हरचा बेजबाबदारपण या सर्वांची दखल घेत, ‘एमएसीटी’ने बेस्टला मृताच्या कुटुंबाला 15.66 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. यातील सात सात लाख तक्रारदार मुलीला द्यावेत आणि उर्वरित रक्कम कुटुंबाला द्यावी, असे निर्देशही ‘एमएसीटी’ने दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List