आयआयटीमध्येही नोकरीची नो गॅरंटी; 36 टक्के विद्यार्थी अजूनही नोकरीपासून वंचित
आयआयटी म्हणजे शंभर टक्के नोकऱ्यांची हमी असे म्हटले जाते. मात्र, आयआयटीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. आयआयटी मुंबईतील 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरी मिळाली नाही. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईतील 32.8 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. यात या वर्षी आणखी भर पडली आहे.
आयआयटी मुंबईमध्ये मे महिन्यापर्यंत प्लेसमेंट प्रक्रिया सुरू राहणार असून यात देशविदेशातील नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर मिळालेली नाही. आयआयटी मुंबईच्या दोन हजार नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली नाही. आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीयरिंग शाखेला सर्वाधिक मागणी असते. दरवर्षी या शाखेतील विद्यार्थ्यांना 100 टक्के प्लेसमेंट मिळते, मात्र या शाखेतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जागतिक मंदीमुळे प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपन्यांना कॅम्पसमध्ये बोलावण्यात अडचणी येत आहे, असे आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List