महिला बचत गटांची उत्पादने डबेवाले घरोघरी पोहोचवणार; ऑनलाइन सुविधेसाठी ‘एसएनडीटी’चे ऍप

महिला बचत गटांची उत्पादने डबेवाले घरोघरी पोहोचवणार; ऑनलाइन सुविधेसाठी ‘एसएनडीटी’चे ऍप

मुंबईतील महिला बचत गटांची उत्पादने आता डबेवाले थेट घरोघरी पोहोचवणार आहेत. यासाठी एसएनडीटीच्या माध्यमातून एक अद्ययावत ऍप तयार केले जाणार आहे. या ऍपवरून तुम्ही आपल्याला हवे असणारी वस्तू, पदार्थाची नोंदणी ऑनलाइन करू शकणार आहात. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी सुरू केलेल्या ऍपमध्ये समाविष्ट असणाऱ्या उत्पादनांसाठी एक विशिष्ट गुणवत्ता परीक्षण, दळणवळण व्यवस्था आदी सगळय़ा निकषांची पूर्तता करणाऱ्या  उत्पादनांचा समावेश असावा, अशा सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी वातावरण संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

ऍपमध्ये काय आहे

या ऍपमध्ये उत्पादने तयार करतानाची महिलांची छायाचित्रे आणि व्हिडीओ याचा समावेश असेल. तसेच अत्यंत प्रभावीपणे ही उत्पादने घरोघरी पोहचतील यासाठी ऍपमध्ये विशिष्ट वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात येतील. तसेच उत्पादनाचे चांगले ब्रँडिंगही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बचत गट उत्पादनांना घरोघरी पोहचवण्यासाठी डबेवाल्यांची यंत्रणा वापरण्यात येणार आहे.

लाखो महिलांना फायदा

मुंबईतील सुमारे दहा हजार महिला बचत गटांसोबत एक लाखांहून अधिक महिला विविध वस्तू आणि उत्पादने तयार करत आहेत.

त्यामध्ये खाद्यपदार्थांपासून ते महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून पालिकेचा नियोजन विभाग ऍप विकसित करण्याची कार्यवाही करीत आहे.

ऍप विकसित करण्यासाठी पालिकेने एसएनडीटी विद्यापीठासोबत सामंजस्य करारही केला आहे. या विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ऑप्लिकेशन विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;