IPL 2024 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज भिडणार

IPL 2024 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज भिडणार

यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंतच्या लढतींमध्ये विरोधकांना नामोहरम करणारी राजस्थान रॉयल्स शनिवारी पंजाब किंग्जविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर भिडणार आहे. सलग चार सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत प्रथम स्थानी असणारी राजस्थान तळाला असलेल्या पंजाबवर भारी पडेल अशी आशा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे, मात्र घरच्या मैदानावर सामना होत असल्याने पंजाबला विजयाचा सूर गवसेल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान रॉयल्स यंदाच्या मोसमात फलंदाजी, गोलंदाजी दोन्ही क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत असून पाच सामन्यांमध्ये चार विजयांसह प्रथम स्थानी कायम आहे, तर  दुसरीकडे पाच सामन्यांत तीन पराभव, दोन विजयांसह पंजाब आठव्या स्थानी आहे.

उद्याचा सामना हा मुल्लानपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजीपुढे पंजाबच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. जॉस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग हे चांगल्या फॉर्मात आहे, मात्र राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालचा फॉर्म हा राजस्थानसाठी चिंतेची बाब ठरला आहे, तर दुसरीकडे ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, नांद्रे बर्गर हे चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे राजस्थानच्या गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांचा निभाव लागतो की नाही हे उद्याच्या सामन्यात कळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;