‘बालिका वधू’ मधील आनंदीचं हैराण करणारं ट्रान्सफॉरमेशन, झाली ट्रोल, ‘सर्जरी चुकीची…’

‘बालिका वधू’ मधील आनंदीचं हैराण करणारं ट्रान्सफॉरमेशन, झाली ट्रोल, ‘सर्जरी चुकीची…’

‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अविकाला ओळखताही येत नाही. मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालं आहे. मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या अविका हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘1920 : हॉरर ऑफ द हार्ट्स’ सिनेमात अभिनेत्री दिसली होती.

नुकताच अविका हिला आनंद पंडित यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या लग्नात स्पॉट करण्यात आलं. रिसेप्शन पार्टीमध्ये अविका हिने हजेरी लावली होती. पार्टीमध्ये गोल्डन रंगाच्या शिमरी कोटमध्ये अविका हिने एन्ट्री केली. त्याठिकाणी पापाराझींना पाहिल्यानंतर अविका हिने हटके पोज देखील दिल्या… अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

काही चाहत्यांना अविका हिचं हैराण करणारं ट्रान्सफॉरमेशन आवडलं आहे तर, काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. अनेकांनी अविका हिने प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा देखील केला आहे. सध्या ट्रायंगुलर चीनची फॅशन सुरु आहे… अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘हिने चीनची सर्जरी केली आहे. कारण पूर्वी ही अशी दिसत नव्हती आणि आता पाहिल्यानंतर तिची सर्जरी चुकली आहे…’ असं वाटत आहे…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौरने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अविका हिच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे.

अविका गौर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अविका गौर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;