विरप्पनच्या कन्येने भाजपाची साथ सोडली

विरप्पनच्या कन्येने भाजपाची साथ सोडली

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तामिळनाडूत कमळ फुलवण्याचा प्रयत्न करणाया भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. कुख्यात तस्कर विरप्पनची कन्या आणि भाजपा नेत्या विद्या रानी यांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यांनी एनटीके अर्थात नाम तमिलर काची या पक्षात प्रवेश केला आहे. एनटीकेने विद्या रानी यांना कृष्णगिरी येथून मैदानात उतरवले आहे.

विद्या रानी या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, त्यांनी तिकिटासाठीच पक्ष बदलला आणि एनटीकेने हीच संधी साधून त्यांना उमेदवारी दिली. दक्षिण हिंदुस्थानात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपाला विद्या रानी यांनी साथ सोडल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागू शकते, असे राजकीय तज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, कृष्णगिरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला असून ही जागा जिंकून आणणे भाजपासाठी आणखी कठीण होऊन बसल्याचेच
दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;