विद्यार्थ्याची आत्महत्या  

विद्यार्थ्याची आत्महत्या  

एमबीबीएसच्या दुसऱया वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज चारकोप परिसरात घडली. अजय जांगिड असे मृताचे नाव आहे.

अजय हा चारकोप येथे राहत होता. तो एमबीबीएसच्या दुसऱया वर्षात शिकत होता. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अजयने घरातील हॉलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. याची माहिती चारकोप पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अजयला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अजयच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;