रविवारी कुठे मेगा ब्लॉक असणार? वाचा सविस्तर बातमी

रविवारी कुठे मेगा ब्लॉक असणार? वाचा सविस्तर बातमी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे सेवेवर 14 एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या वेळांमधील बदल अवश्य पाहा.

मध्य रेल्वे –

सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.43 ते दुपारी 3.44 पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद सेवा मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप धीमी सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. व पुन्हा मुलुंड येथे वेळापत्रकाच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावर धावतील.
सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील/निघतील.

डाउन धीम्या मार्गावर –
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.05 वाजता सुटणार आहे.

अप धीम्या मार्गावर –
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी 10.25 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ लोकल ही ठाणे येथून दुपारी 04.17 वाजता सुटेल.

हार्बर रेल्वे –

सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला व पनवेल – वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

डाउन हार्बर मार्गावर – 
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.44 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर –
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10.05 वाजता पनवेल येथून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3.45 वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;