मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; अंतरिम जामिनाची सुनावणी पुढे ढकलली

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; अंतरिम जामिनाची सुनावणी पुढे ढकलली

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयाडून दिलासा मिळालेला नाही. सिसोदिया यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तर न्यायालयाने ईडी आणि सीबीआयला उत्तर देण्यासाठी आठवडाभराचा वेळ दिला आहे.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता. त्यासाठी त्यांनी राऊज एव्हेन्यू न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीशांनी ईडी आणि सीबीआयला यावर उत्तर देण्यासाठी आठवडाभराचा वेळ दिला. आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 20 एप्रिलला होणार आहे.

मनीष सिसोदिया यांनी काही दिवसांपूर्वी भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जामीन मागितला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. तत्कालीन विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी मनीष सिसोदिया यांना 2 लाख खासगी बॉण्ड आणि तेवढीच जामीन रक्कम देण्याचा आदेश दिला होता. मनीष सिसोदिया गेल्यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;