बाहदराबादचे अभिषेक जोंधळे पोलीस सब इन्स्पेक्टर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

बाहदराबादचे अभिषेक जोंधळे पोलीस सब इन्स्पेक्टर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथील मीनानाथ पंढरीनाथ जोंधळे यांचे चिरंजीव अभिषेक जोंधळे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यात नवव्या रँक मध्ये स्थान मिळवत आपले पोलीस सब इन्स्पेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहेत.

सरकारी अधिकारी होणे हे तरुणांचे ध्येय असते. जिद्द चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर एमपीएससी यूपीएससी परीक्षा देतात मात्र पहिला दुसरा तिसरा प्रयत्न झाल्यानंतर काहींना अपयश येते. काहींचे स्वप्न भंग होते. मात्र अभिषेक मिनानाथ जोंधळे यांनी पहिल्या प्रयत्नातच ही परीक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केले. मीनानाथ जोंधळे यांचे हे दुसरे चिरंजीव असून पहिल्या मुलानेही मागील काही वर्षांपूर्वी तहसीलदार पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.पी एस पदी निवड झाल्याबद्दल जोंधळे यांचे पोहेगांव पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;