कांजीवरम साडी, मोकळे केस सोडून पीक कापणीची ॲक्टिंग; हेमा मालिनी ट्रोल
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या शेतात पीक कापणी करताना दिसत आहेत. कांजीवरम साडी नेसून गव्हाची पीक कापणी करतानाचे त्यांचे फोटो पाहून काही नेटकरी चांगलेच भडकले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत.
हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर चार विविध फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या पीक कापणी करताना, कापणी केलेल्या पिकासोबत फोटोसाठी पोझ देताना आणि शेतमजूर महिलांसोबत उभं राहून फोटो काढताना दिसत आहेत.
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'आज मी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या शेतात गेली, ज्यांना मी गेल्या दहा वर्षांपासून नियमित भेटतेय. मला भेटून ते खूप खुश झाले आणि त्यांनी मला फोटोसाठी पोझसुद्धा देण्याची विनंती केली. त्यामुळे मी हे फोटो काढले.'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List