‘दोन पक्ष फोडले तरी देखील…’, असली-नकलीवरून जयंत पाटलांचा अमित शहांना टोला
एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचे. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले तरीदेखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच नकली आणि असली हे नवीन प्रकरण तयार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कोण नकली आणि कोण असली हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्राची जनता हुजार असून जे फुटून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात यंदाचा निकाल असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
अमित शहा यांना योग्य त्या व्यासपीठावरून योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ. शरद पवार यांनी महाराष्ट्राला काय दिले हे राज्यातील तरुणांना, महिलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना व सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच महाराष्ट्र त्यांना मानतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे हा सगळ्यांचा प्रयत्न होता. परंतु पवारांनी ती विचारधारा स्वीकारण्याला नकार दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.
महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न लोकांपुढे माडण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीने केला आहे. लोकांचा याला पाठिंबा मिळतोय, असेही जयंत पाटील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List