सहा हजार हिंदुस्थानी पोटासाठी इस्रायलला जाणार
इस्रायल-हमास युद्ध गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या युद्धात इस्रायलला सैनिकांची कमतरता भासत आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये सहा हजार हिंदुस्थानी नागरिक इस्रायलला जाणार असून ते कामगारांची कमतरता भरून काढणार आहेत. डिसेंबरमध्ये 800 हून अधिक हिंदुस्थानी नोकरीसाठी इस्रायलला पोहोचले होते. त्यापैकी बहुतांश केरळ, तामीळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील होते.
खरे म्हणजे मे 2023 मध्ये इस्रायल आणि हिंदुस्थान यांच्यात कामगार संबंधाबाबत एक करार झाला होता. याअंतर्गत 42 हजार हिंदुस्थानी कामगार इस्रायलमध्ये काम करणार होते. डिसेंबरमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युद्धसंदर्भात पह्नवर चर्चा केली होती. यादरम्यान हिंदुस्थानी कामगार इस्रायलमध्ये पाठवण्याचा करार वेगवान गतीने करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये करार झाला. सहा हजार हिंदुस्थानी इस्रायलला पोहोचण्याच्या निर्णयावर इस्रायल सरकारने सांगितले की, इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रासाठी अल्पावधीत आलेल्या परदेशी कामगारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने तेथे काम करणाऱया
पॅलेस्टिनींना कामाचे परवाने नाकारले. त्या वेळी सुमारे 80 हजार पॅलेस्टिनी मजूर इस्रायलच्या बांधकाम उद्योगात काम करत होते. ते गेल्यानंतर इस्रायलमध्ये मजुरांची टंचाई निर्माण झाली. इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे हे सर्व कामगारांना माहीत असूनही ते तिथे जात आहेत. कारण, हिंदुस्थानात नोकऱया नाहीत. हिंदुस्थानात रोजंदारीचे काम हे तात्पुरते काम आहे, म्हणजेच आज काम असेल तर उद्या असेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील कामगारांना दीर्घकालीन नोकऱयांमध्ये जास्त रस आहे. यामुळेच जीव धोक्यात असतानाही हे कामगार आपल्या जीवनात स्थैर्यासाठी इस्रायलला जाण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
पाच पट जास्त पगार
इस्रायलमधील कामगार लोखंडी बांधणी, फरशी बसवणे, प्लास्टरिंग आणि सुतारकाम यांसारखी कामे करतात. त्यांना हिंदुस्थानच्या तुलनेत पाच पट जास्त पगार दिला जातो. मेपॅनिकल किंवा बांधकाम व्यवसायात डिप्लोमा केलेल्या हिंदुस्थानातील कामगारांना दर महिना 1.37 लाख पगार दिला जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List