काय सांगता! पाकिस्तानात चार लाख प्रोफेशनल भिकारी

काय सांगता! पाकिस्तानात चार लाख प्रोफेशनल भिकारी

पाकिस्तानमध्ये महागाईने आधीच उच्चांक गाठल्याने महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पाकिस्तानच्या नवनियुक्त पेंद्रीय अर्थमंत्र्यांपुढे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान उभे आहे, तर दुसरीकडे घराबाहेर पडलेल्या लोकांना वेगळय़ाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये हजारो भिकाऱयांनी डेरा टाकला आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भिकाऱयांनी शहराच्या प्रत्येक गजबजलेल्या ठिकाणी घेराव घातल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा, ट्रफिक सिग्नल्स, शॉपिंग मॉल आणि मशिदींच्या बाहेर भिकाऱयांनी लोकांना अडवून पैसे मागणे सुरू केल्याचे दिसत आहे.

सध्या पाकिस्तानात तेल आणि खाण्या-पिण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे. पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. त्यात हे नवीनच संकट लोकांपुढे उभे राहिले आहे. धड सुखाने बाहेर फिरणेही मुश्कील झाले आहे. द न्यूज इंटरनॅशनल या वृत्तपत्राने कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांच्या हवाल्याने म्हटले की, साधारण तीन ते चार लाख सराईत भिकारी ईदच्या पार्श्वभूमीवर कराचीसारख्या महानगरांमध्ये आलेले आहेत. भिकारी आणि आरोपी प्रकारातील लोक कराचीला एक प्रमुख बाजारपेठेचे शहर समजतात. हे भिकारी सिंध, बलुचिस्तान आणि देशातील इतर ठिकाणांहून कराचीत येतात. परंतु आम्ही पारंपरिक पद्धतीने आरोपींचा तपास लावू शकत नाही. त्यामुळे पॅमेऱयांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे, असे मिन्हास यांनी सांगितले.

सौदीत बहुतांश पाकीटमार पाकिस्तानी

पाकिस्तानी भिकारी जियारतच्या आडून मध्य पूर्वेची यात्रा करतात. प्रवासी पाकिस्तानी सचिव जीशान खानजादा यांनी मागच्या वर्षी सांगितलेले की, “बहुतांश भिकारी उमरा वी वीजावर सौदी अरेबियाला जातात. तिथे जाऊन भीक मागण्याचे काम करतात. मक्का येथील भव्य मशिदीच्या आवारात अटक करण्यात आलेले बहुतांश पाकीटमार पाकिस्तानातील आहेत.’’  

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;