Haryana School Bus accident : मुख्याध्यापकाच्या एका चुकीने घेतला 6 चिमुकल्यांचा जीव
हरियाणा येथील महेंद्रगढमध्ये गुरूवारी झालेल्या बस अपघातात सहा निरागस मुलांचा जीव गेला. अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले होते. मात्र आता या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकाचा बेफिकीरपणा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले होते. ग्रामस्थांनी शाळेच्या बसची चावी काढून बस रोखली होती. मात्र त्याचवेळी मुख्याध्यापकांना फोन केला त्यावेळी त्यांनी चालकाला आजचा दिवस चावी द्या आणि मात्र मुख्याध्यापकांनी आता पुरता त्याला जायला द्याा उद्या त्याला काढून टाकतो असे सांगितले. पण वेळीच मुख्याध्यापकांनी योग्य निर्णय घेतला असता तर या चिमुकल्यांचा जीव वाचला असता.
याप्रकरणी आता शिक्षण मंत्र्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापकांना सांगूनही त्यांनी यावर काही अॅक्शन घेतली नाही. त्यामुळे याचा तपास करणार असल्याचे सांगितले. घटनास्थळी शिक्षणमंत्री सीमा त्रिखा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याप्रकरणी कारणे सांगा नोटीस पाठवली आहे. या घटनेसाठी जबाबदार बसचालक, शाळा संचालक आणि मुख्याध्यापक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून शाळेची मान्यताही रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
हरियाणात स्कूल बसचा भीषण अपघात, 6 मुलांचा मृत्यू; सरकारी सुट्टीच्या दिवशीही सुरू होती शाळा
कनीना येथील जीएलपी शाळेची बस कनीनाहून धनौदा येथे जाताना ही बस कन्या महाविद्यालयाजवळ कनिना ते धनुंदा या रस्त्यावरील गर्ल्स कॉलेजजवळ कनिना येथील जीएलपी स्कूलची बस वळण घेत असताना बस उलटली होती. या बसमध्ये 43 मुले होती. अपघातानंतर 6 मुलांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List