ईदनिमित्त शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा पूर; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

ईदनिमित्त शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांचा पूर; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

दरवर्षी रमजान ईदनिमित्त बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घरासमोर गर्दी करतात. यंदाही सलमानला भेटण्यासाठी चाहत्यांनी वांद्रे इथल्या त्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटसमोर गर्दी केली होती. सलमानच्या घरासमोर जमलेल्या या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अखेर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दुसरीकडे शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेरही चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास बंगल्याबाहेर उन्हात उभे होते. अखेर शाहरुखने बंगल्याच्या बाल्कनीमध्ये येत चाहत्यांना अभिवादन केलं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत कितीही नवनवीन अभिनेते आले तरी सलमान खान आणि शाहरुख खान यांची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा चाहतावर्ग वाढतच जातोय. दरवर्षी रमजान ईदनिमित्त आपल्या या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करतात. वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात सकाळपासूनच चाहते जमा होऊ लागले होते. रात्री सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी आपल्या घराच्या गच्चीतून चाहत्यांना अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. घरासमोरील रस्त्याच्या एका बाजूला या चाहत्यांना उभं राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पण नंतर ही गर्दी वाढतच गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर सलमान आणि शाहरुख खानचे हे व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात जमलेला जनसमुदाय भारावून टाकणारा आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो. मात्र यंदाची ईद अपवाद ठरली. सलमानने 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

केवळ ईदलाच नाही तर सलमान आणि शाहरुखच्या वाढदिवशीसुद्धा त्यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची अशीच गर्दी जमते. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही सलमान आणि शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांना एकत्र पाहणंही चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;