रीलसाठी वाट्टेल ते! ती चक्क झाडाच्या शेंडय़ावर चढली
रील बनवून फेमस होण्यासाठी लोक काय-काय करतील याचा नेम नाही. फॉलोअर्स वाढविण्यासाठी एका तरुणीने स्वतःचा जीव धोक्यात घातला. कोणत्याही सपोर्टशिवाय चक्क झाडाच्या शेंडय़ावर चढून ही तरुणी डान्स करीत होती. हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. ‘राम दूत हनुमान का नारा…’ भजनावर या तरुणीने झाडावर चढून क्लासिकल नृत्य केले आहे. तिच्या व्हिडीओवर वेगवेगळय़ा कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे झाडाच्या अगदी बारीक फांदीवर चढून ती डान्स करत आहेत. ‘चैन मेरा तूने ले लिया…’ गाण्यावरही तरुणीने डान्स केला. झाडाची फांदी जर तुटली तर काय होणार? असा प्रश्न अनेक युजर्स विचारत आहेत. हा व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले आहे की, ‘हिंदुस्थानी नृत्य एवढय़ा उंचीवर पोहोचले आहे…मला ते कळलेच नाही.’ दुसऱया युजरने लिहिले आहे की, ‘मी झाड पडण्याची वाट पाहत होतो.’ आणखी एकाने लिहिले आहे की, ‘ पापा की परी…’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List