मला कोणत्या पुरुषाची गरज… नोरा फतेही हिच्या सडेतोड वक्तव्याची चर्चा, महिलांची बाजू मांडत म्हणाली…

मला कोणत्या पुरुषाची गरज… नोरा फतेही हिच्या सडेतोड वक्तव्याची चर्चा, महिलांची बाजू मांडत म्हणाली…

अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या बोल्ड लूक आणि डान्समुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या लूक आणि डान्समुळे नाहीतर, सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री महिला, महिलांचं स्वतंत्र्य आणि स्त्रीवाद यावर मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नोरा फतेही म्हणाली, ‘मला कोणत्या पुरुषाची गरज नाही आणि स्त्रीवाद सारख्या गोष्टीवर मला विश्वास नाही. महिलांना कामावर जायला हवं. महिलांना स्वतःचं आयुष्य आहे… महिलांनी स्वतंत्र व्हायला हवं पण एका मर्यादेपर्यंत…’फेमिनिज्म’ सारख्या गोष्टींची गरज नाही. माझा या मूर्खपणावर विश्वास नाही. मला वाटतं, स्त्रीवादाने आपला समाज उद्ध्वस्त केला आहे.

‘मला वाटतं महिला पालन – पोषण करणाऱ्या असतात… पण त्यांना कामाला जायला हवं आणि स्वतःचं आयुष्य जगायला हवं… महिलांना एक आई, पत्नी आणि पालन – पोषणाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असायला हवं… जसे पुरूषाने पुरवठादार, पैसे कमावणारा, पिता आणि पती अशी भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

लोकं याला जुने आणि पारंपरिक विचार समजतात, पण अभिनेत्रीनुसार, हे विचार नॉर्मल आहेत…काही पुरुषांना घरातल्या कर्त्या पुरुषांची भूमिका बजावायची नसते… फेमिनिज्मच्या विश्वात पुरुषांचं ब्रेनवॉश केलं जात आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नोरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘साकी साकी’, ‘दिलबर दिलबर’, ‘पछताओगे’ आणि ‘डांस मेरी रानी’ गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्याचं मनोरंजन केलं. नोराच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील नोरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील नोरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, नोरा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या रिलेशिनशिपच्या देखील चर्चा रंगल्या. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;