Lok Sabha Election 2024 : मोदींचे वागणे गल्लीतील गुंडासारखे, प्रकाश आंबेडकर बरसले

Lok Sabha Election 2024 : मोदींचे वागणे गल्लीतील गुंडासारखे, प्रकाश आंबेडकर बरसले

नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी लायक नाहीत. मोदी गल्लीतील दादासारखे, गुंडासारखे वागतात. गल्लीतील गुंड ज्या प्रमाणे हप्तावसुली करतात, त्याप्रमाणे ईडी, सीबीआयची भीती दाखवून मोदींनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसुली केली. ज्यांचा हप्ता आला त्यांची चौकशी थांबली, असा जबरदस्त घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील वंचितचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.

हे वाचा – मोदी हे संघाच्या मानगुटीवरील भूत! प्रकाश आंबेडकर यांची टीका

इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून ज्यांनी पैसे दिले, त्यांना आधी ईडीची नोटीस गेली, चौकशीला बोलावले. चौकशी होऊ नये, नोटीस होऊ नये म्हणून कोणी 300 कोटी, तर कोणी 500 कोटींचा बॉण्ड दिला आणि सुटका करून घेतली. गल्लीतील गुंड, दादाही असाच हप्ता ठरवतो, असा टोला आंबेडकर यांनी लगावला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांना हिटलरचीही उपमा दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;