31 मेपूर्वी मॅनहोल जाळय़ांनी सुरक्षित करा! पालिका आयुक्तांचे सर्व 25 वॉर्डना निर्देश
पावसाळय़ापूर्वी सर्व मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित करा, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त- प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व 25 वॉर्डना दिले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि 31 मेपर्यंत हे काम पूर्ण करावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
मुंबईत पर्जन्य मलनिस्सारण प्रचालन खाते व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे मिळून सुमारे एक लाखांवर मॅनहोल आहेत. यातील हजारो मॅनहोलवर अजूनही सुरक्षा जाळी नसल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. ऑगस्ट 2017 मध्ये परळ येथे उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून मुंबई रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर उघडय़ा मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर काही वेळा समाजकंटकांकडून मॅनहोलचे झाकण चोरण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे उघडय़ा मॅनहोल सुरक्षा जाळीने बंदिस्त करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तर पाणी तुंबणाऱया ठिकाणचे सर्व मॅनहोल सुरक्षित जाळीने बंदिस्त केले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तर सर्वच एक लाखांवर असणारे मॅनहोल जाळीने सुरक्षित करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
अशी आहे मॅनहोलची स्थिती
एकूण मॅनहोल 1 लाख 286
मलनिŠसारण विभाग 74 हजार 693
पर्जन्य जलवाहिन्या विभाग 25 हजार 593
संरक्षक जाळय़ा बसवल्या
मलनिŠसारण विभाग 1 हजार 982
पर्जन्य जलवाहिन्या विभाग 3 हजार 692
एकूण 5 हजार 674
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List