ऐन निवडणुकीत वर्ध्यातील भाजप खासदार अडचणी; तरामदास तडस यांच्या सुनेचे घरगुती हिंसाचाराचे आरोप

ऐन निवडणुकीत वर्ध्यातील भाजप खासदार अडचणी; तरामदास तडस यांच्या सुनेचे घरगुती हिंसाचाराचे आरोप

वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार अशी हवा असतानाच आता त्यांची सून पूजा यांनी रामदास तडस आणि मुलगा पंकज यांच्यावर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गंभीर आरोपामुळे तडस पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह आज पत्रकार परिषदेत त्यांनी घरगुती हिंसाचाराला वाचा फोडली.

पूजा तडस यांनी पत्रकार परिषेदत पिता-पुत्रांकडून सुरू असलेल्या छळवणुकीची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही केली. पूजा म्हणाल्या, ‘मी लग्न करून सासरी गेली तेव्हा मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले. एकदा तर मला लोखंडी रॉडनेही मारहाण करण्यात आली.’

दरम्यान, पूजा तडस यांच्या आरोपांचे रामदास तडस यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले. ‘निवडणुका आल्या की माझ्यावर असे गंभीर आरोप केले जातात. माझ्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. माझ्या मुलगा आणि पूजा यांनी लग्न केले तेव्हा आम्हाला याची माहिती नव्हती. पूजा या आमच्याबरोबर राहत नाही. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाले. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे माझे या प्रकरणाशी काहीही घेणेदेणे नाही,’ असे ते म्हणाले.

…तर समाजाला काय न्याय देणार?

माझ्या बाळाला घेऊन मी अनेक ठिकाणी फिरते आहे. ज्या फ्लॅटवर आम्ही राहत होतो तो फ्लॅट विकून मला बेघर करण्यात आले. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन मला त्रास दिला जात आहे. रामदास तडस एक लोकप्रतिनिधी जर त्यांच्या सुनेला न्याय देऊ शकत नसतील तर ते समाजाला काय न्याय देतील, असा प्रश्नही पूजा यांनी केला आहे.

तडस यांच्या सुनेने काय आरोप केले आहेत…

– स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी आमचे लग्न लावून देण्यात आले.

– लग्नानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवण्यात आले. तिथे वाईट पद्धतीने माझ्याशी वागण्यात आले. तिथे मला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून ठेवण्यात आले. त्यातूनच माझ्या बाळाचा जन्म झाला.

– बाळाच्या जन्मानंतर हे बाळ कोणाचे आहे त्याची डीएनए चाचणी कर, असा दबाव माझ्यावर टाकण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;