इतिहासाची मोडतोड करणाऱया मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

इतिहासाची मोडतोड करणाऱया मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

हिंदुत्वाच्या अभिमानाची भाषा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू सणांबद्दलचे अज्ञान तसेच इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी अडचणीत सापडले आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल दोघा नागरिकांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाही करू, असा इशारा नोटिसीतून दिला आहे.

सौरभ अशोकराव ठाकरे व तेजस राहुल बैस यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अत्यंत जबाबदारीच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले असतानाही आपणाला जबाबदारीने बोलण्याचे भान नाही, असे आपल्या अनेक वक्तव्यांवरून दिसते. प्रक्षोभक, बेताल, खोटारडी व दिशाभूल करणारी जाहीर विधाने करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम करता हे अत्यंत दुःखद आहे. मुख्यमंत्री पदावर बसून काहीही बोलण्याचा अधिकार आहे, असा आपला गैरसमज असेल तर तो काढून टाका, असे मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून नोटिसीतून म्हटले आहे. वांद्रे-बीकेसी येथील दसरा मेळाव्यात ‘महादजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढले व शहीद झाले, पण मागे हटले नाही,’ असा उल्लेख केला. तसेच गुढीपाडवा हा प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरा करतो, असे विधान ठाण्यात केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करणाऱया आणि धर्मभावना दुखावणाऱया या विधानांबद्दल पुढील सात दिवसांत जाहीर माफी मागा तसेच लेखी माफीनामा पाठवा, अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाही करू, असा इशारा शिंदेंना देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या नोटिसीत काय म्हटलेय?

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर महादजी शिंदे यांचा जन्म 50 वर्षांनी झाला, तर दत्ताजीराव शिंदे यांचा जन्म 43 वर्षांनी झाला. पण मुख्यमंत्री पदावर असूनही बुद्धीला ताण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 40-50 वर्षांनी जन्मलेल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढाईला पाठवले हा पराक्रम आपणच (शिंदेंना उद्देशून) करू शकता. अशी इतिहासाची मोडतोड अक्षम्य स्वरूपाची आहे.

गुढीपाडवा हा सण प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरा केला जातो हे आपले विधान अत्यंत हास्यास्पद आणि आमची मान खाली घालायला लावणारे आहे. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. शाळेत जाणाऱया प्रत्येक मुलालाही ही बाब माहीत आहे, पण तुम्ही गुढीपाडव्याला दसऱयाचे नाव देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

हिंदू सणांची साधी माहिती नसणे हे दुर्दैव!

तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून एक प्रादेशिक पक्ष पह्डून त्यावर स्वतःची मालकी प्रस्थापित केली. हिंदुत्व हा शब्द सातत्याने वापरणाऱया आपल्यासारख्या व्यक्तीला हिंदू सणांची साधी माहिती नाही, हे पाहून आम्हाला अत्यंत वाईट वाटले, असे सौरभ ठाकरे व तेजस बैस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;