करणी सेनेच्या अध्यक्षाला  हायकोर्टाचा दिलासा नाही

करणी सेनेच्या अध्यक्षाला  हायकोर्टाचा दिलासा नाही

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारीला साजरा केला जाणाऱया ‘शौर्य दिना’बद्दल वादग्रस्त विधान करणारे करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांना उच्च न्यायालयाने दिलासा नाकारला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी सेंगर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देत पनवेल सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधातील अपील फेटाळले.

‘इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन देशात साजरा कसा काय होतो? देशात गद्दारांचा सन्मान होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या देशासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले आहे त्यांचा हा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ सरकारने पाडला पाहिजे,’ असे विधान सेंगर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. याप्रकरणी अॅड. अमित कटारनवरे यांनी अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या तक्रारीच्या आधारे नवीन पनवेल पोलीस ठाण्यात सेंगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अटकेची शक्यता वाढल्याने सेंगर यांनी पनवेल सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. तेथे अर्ज फेटाळल्यामुळे सेंगर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, सेंगर यांचे विधान विजयस्तंभाचा अनादर करणारे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती कोतवाल यांनी सेंगर यांचे अपील फेटाळले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;